कर्नाटकातील काँग्रेस आमदाराच्या वक्तव्याने खळबळ; जेडीएस-काँग्रेस आघाडीला ठरवलं ‘अपवित्र’

कर्नाटक – काँग्रेस आणि जेडीएस यांच्या कर्नाटकातील आघाडी सरकारला लागलेली घरघर काही केल्या कमी होताना दिसत नाहीये. खुद्द काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील कर्नाटकातील काँग्रेस नेत्यांना आपल्या वक्तव्यांवर नियंत्रण ठेवण्याची तंबी दिल्यानंतरही आज काँग्रेसचे कर्नाटकातील विद्यमान आमदार डॉ. के सुधाकर यांनी मुक्ताफळं उधळली आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, काँग्रेसचे आमदार डॉ. के सुधाकर यांनी कर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस आघाडी सरकारला अपिवत्र ठरवले असून ते म्हणतात, “मी ही आघाडी स्थापनेच्या पहिल्या दिवसापासूनच माझी भूमिका स्पष्टपणे मांडली असून ही आघाडी केवळ राजकीय हेतूने प्रेरित असल्याची माझी भूमिका आहे. अशाप्रकारची केवळ राजकीय हेतूने प्रेरित असलेली ही आघाडी अत्यंत अपवित्र असल्याचेही मी मानतो.”

तत्पूर्वी, कर्नाटकमध्ये धर्मनिरपेक्ष जनता दलाबरोबरच्या ताणलेल्या संबंधांच्या पार्श्‍वभुमीवर कॉंग्रेस अध्यक्षांनी कॉंग्रेसच्या स्थानिक नेत्यांना कानपिचक्‍या देताना, आघाडी धोक्‍यात आणण्याचे वर्तन सहन केले जाणार नाही, असे खडसावल्याचे प्रदेश कार्याध्यक्ष दिनेश गुंडुराव यांनी सांगितले होते.

दरम्यान, आधीच काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलातील संबंध दुरावले असताना काँग्रेसच्या आमदाराने अशा प्रकारचे वक्तव्य केल्याने काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here