करोनासंदर्भात चुकीचा मेसेज केला “फॉरवर्ड’

निरगुडसरच्या युवकावर मंचर पोलिसांकडून गुन्हा दाखल

मंचर  -निरगुडसर येथे मुंबईवरून आलेल्या 45 जणांमध्ये करोनाची लक्षणे आढळली. एक करोना रुग्ण वायसीएम येथे रवाना. ग्रामीण भागात खळबळ.

सर्वांनी काळजी घ्या…, अशा मजकुराचा चुकीचा मेसेज व्हॉट्‌स-ऍप ग्रूपवर टाकला आणि या मेसेजमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊन समाजात अफवा पसरवल्याप्रकरणी मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस जवान विनोद गायकवाड यांनी मिलिंद शांताराम वळसे यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे.

करोनाच्या पार्श्‍वभूमीवर समाज माध्यमांवर कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होईल, अफवेचा, फोटो, संदेश टाकण्यास बंदी असतानाही शनिवारी (दि. 23) निरगुडसर येथील मिलिंद वळसे याने एका ग्रुपवर करोनासंदर्भात मजकूर फॉरवर्ड केला. मेसेजमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला.

समाजात अफवा पसरवल्याप्रकरणी संबंधिताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस जवान सागर गायकवाड करीत आहेत. समाजात तेढ निर्माण होईल असे आणि करोनासंदर्भातील अफवा पसरवणारे मेसेज सोशल मीडियावर टाकू नका, असे आवाहन मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांनी केले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.