Pune News : लसीकरण केंद्रातील गैरसोयी तातडीनं दूर कराव्यात; शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार यांची मागणी

पुणे : केंद्रशासनाच्या आदेशानुसार, 1 मार्च 2021 पासून 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व 45 वर्षे ते 59 वर्षामधील गंभीर आजार असलेल्या नागरिकांना कोविड प्रतिबंधक लस देण्याबाबतच तिसरा टप्पा सुरू झाला आहे. हे लसीकरण मनपा रूग्णालये, शासकीय रूग्णालये व खाजगी रूग्णालयांतून देणार आहे.

मनपा व शासकीय रूग्णालयामध्ये ही लस मोफत दिली जाणार आहे. सदर तिसरा टप्पा सुरू होत असताना लसीकरण केंद्रावरमोठया प्रमाणात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे केंद्रावर या लसीकरणाबाबत होत असलेला गोंधळ तातडीनं दुर करण्यासाठी प्रशासनाने उपाय योजना राबविण्याची मागणी शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

सुतार म्हणाले की, केंद्रावरती असलेल्या स्टाफला व डॉक्‍टरांना सुध्दा पुर्णपणे माहिती नाही. त्यामुळे हजारोंच्या संख्येने ज्येष्ठ नागरिक त्याठिकाणी येत आहेत, अशा प्रकारे जर हजारो नागरिक
एकत्र आले तर कोविडची समस्या दूर होणेऐवजी सदर समस्या अजून गंभीर होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मार्गदर्शन सुविधा फ्लेक्‍स, बॅनर, रूग्णालयाचे दर्शनी भागावर लावावेत, केंद्रावर अर्ज भरणा-यांची वेगळी रांग तसेच लस घेणा-यांची वेगळी रांग असावी,

ज्येष्ठ नागरिकांना उन्हाळा असल्यामुळे सदरच्या केंद्रावर मंडपाची व खुर्चीची व्यवस्था करावी, दररोज किती नागरिकांचे लसीकरण होणार आहे याची माहिती जाहिर करावी.कोणकोणते आजार असलेल्या 45 वर्षापुढील नागरिकांना लस मिळणार त्या आजारांची यादी फ्लेक्‍स व बॅनरद्वारे दर्शनी भागात लावावेत अशा सूचना सुतार यांनी आपल्या निवेदनात केल्या आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.