मिश्र दुहेरीत भारताचे आव्हान संपुष्टात

टोकियो – तिरंदाजीतील मिश्र दुहेरीतील आव्हान संपुष्टात आले असून, आता वैयक्तिक आणि पुरुष सांघिक प्रकारात भारतीय तिरदांजाना आपले सर्वस्व पणाला लावावे लागणार आहे.
पात्रता फेरीतील कामगिरीच्या निकषावर ऐनवेळेस बदल झाल्याने मिक्ष दुहेरीतील दीपिका कुमारी – प्रविण जाधवला असातत्याचा फटका बसला आहे.

उप-उपांत्यपूर्व फेरीत तैवानवर विजय मिळविल्यावर त्यांना अव्वल मानांकित कोरियाविरुद्ध एकतर्फी लढतीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
दीपिका आणि प्रविण प्रथमच आंतरराष्ट्रीय स्तरावर एकत्र खेळत होते. त्यांनी तैवानवर विजय मिळविला. मात्र, कोरिया विरुद्ध ते अडखळले. त्यांना कोरियाविरुद्ध 2-6 असा पराभव पत्करावा लागला.

तिरंदाजीच्या मैदानावरून
-भारतीय पहिल्या सेटमध्येही दहा गुणांची कमाई करू शकले नाहीत.

-दीपिकाला अंतिम लढतीत आठ पैकी एकाही संधीत दहा गुणांचा नेम साधण्यात अपयश.

– प्रविण पदार्पणात इतके मोठे दडपण पेलू शकला नाही.चौथ्या सेटला त्याने सलग तीन दहा गुणांचा लक्ष्य भेद करताना सातत्य राखण्यात अपयश.

– कोरियाच्या अव्वल मांकित अॅन सॅन आणि किम जे देऑक यांनी कमालीच्या अचूकतेने पहिला सेट 35-32 जिंकला.

-भारताने हा सेट 37-38असा गमावला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.