राष्ट्रवादीत इन्कमिंग सुरूच, माजी आमदार सीताराम घनदाट यांचा पक्षात प्रवेश

मुंबई  : महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भरती सुरूच आहे. आज परभणीचे माजी अपक्ष आमदार आणि अभ्युदय को ऑपरेटिव्ह बँकेचे मानद अध्यक्ष सीताराम घनदाट आणि त्यांचे नातू भरत घनदाट यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

याबाबत  राष्ट्रवादी काँग्रेस अधिकृत ट्विटर अकॉउंट द्वारे माहिती देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबईतील कार्यालयात हा प्रवेश सोहळा पार पडला.

दरम्यान , सीताराम घनदाट यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनीही राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला आहे. ‘पक्षाची ध्येयधोरणे लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी सीताराम घनदाट व त्यांचे कार्यकर्ते प्रयत्न करतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान,परभणीतून  घनदाट हे अपक्ष आमदार म्हणून निवडले गेले आहेत. राजकारणात येण्यापूर्वी घनदाट यांनी विधिमंडळात शिपाई म्हणून 17 वर्षं काम केलं होतं आणि टॅक्सी ड्रायव्हर म्हणून ३ वर्षं काम केलं होतं.

Leave A Reply

Your email address will not be published.