नवी दिल्ली – ज्या करदात्यांच्या ताळेबंदांचे ऑडिट करणे आवश्यक असते अशा करदात्यांना आता 15 मार्चपर्यंत विवरण सादर करता येणार आहे. या करदात्यांचा टॅक्स ऑडिट रिपोर्ट भरण्याची 15 जानेवारी ही शेवटची तारीख होती.
ही तारीख वाढवून 15 फेब्रुवारी करण्यात आली आहे. मात्र इतर सर्वसामान्य करदात्यांची विवरण सादर करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर होती. त्यामध्ये कसलाही बदल करण्यात आला नसल्याचे केंद्रीय प्रत्यक्ष कर विभागाने स्पष्ट केले आहे.
कंपन्यांच्या विवरण सादरीकरणातची तारीख वाढवावी त्याचबरोबर टॅक्स ऑडिट रिपोर्ट सादर करण्याची तारीख वाढवावी अशी मागणी चार्टर्ड अकाऊंटच्या संघटनेने प्रत्यक्ष कर मंडळाकडे केली होती. ओमायक्रॉन आणि तांत्रिक अडचणींमुळे ही कालमर्यादा वाढविण्यात आली असल्याचे प्रत्यक्ष कर मंडळाने म्हटले आहे.