पुणे – आरक्षणाच्या जागांवर मिळकत कर आकारला जात असल्याचा आरोप नगरसेवक प्रकाश कदम यांनी मंगळवारी महापालिका मुख्यसभेत केला. मात्र, ताब्यात न आलेल्या आणि अजूनही मालकांच्याच ताब्यात असलेल्या जागांवर मिळकतकर आकारण्यात येतो, असा खुलासा महापालिका आयुक्तांनी मुख्यसभेत केला.
महापालिकेच्या आरक्षणाच्या जागांना किती मिळकतकर आकारला जातो, मुळात अशा जागा किती आहेत याची माहिती मुख्यसभेला द्या, अशी मागणी यावेळी करण्यात आली. टीडीआर किंवा रकमेच्या स्वरूपात मोबदला दिल्यानंतर ज्या जागा ताब्यात घेतो, त्यानंतर जागा मालकाकडून मिळकतकर घेण्याचा प्रश्न उरत नाही. मात्र, या प्रक्रियेच्या आधीपर्यंतचा मिळकतकर भरून घेतला जातो, असे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी स्पष्ट केले.