आयकर विभाग माझ्या घरावर धाड मारणार; पी. चिदंबरम यांचा दावा 

नवी दिल्ली – आयकर विभाग आपल्या घरावर धाड मारणार आहे, असा दावा माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केला आहे. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्याशी संबंधित ५० ठिकाणी आयकर  विभागाने छापे घातले. या पार्श्वभूमीवर पी. चिदंबरम यांनी हा दावा ट्विटरद्वारे केला आहे.

पी. चिदंबरम म्हणाले कि, माझ्या शिवगंगा येथील घरावर आयकर विभाग धाड मारणार आहे. आम्ही सर्च पार्टीचं स्वागत करतो. लपवण्यासारखं माझ्याकडे काहीच नाही हे आयकर विभागाला माहित आहे. याआधीही आयकर आणि इतर संस्थांनी माझ्या घराची झडती घेतली आहे आणि त्यात काहीच मिळालं नव्हतं. मात्र केवळ निवडणुकीतील प्रचारातून लक्ष विचलित करण्यासाठी ही कारवाई केली जात आहे, असा आरोप त्यांनी केला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.