कोल्हापूर – कोल्हापुरातील राष्ट्रवादीचे आमदार व जिल्हा बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांच्या घरावर आयकर विभागाने छापा मारला आहे. हसन मुश्रीफ यांचे घर आणि साखर कारखाने या ठिकाणी हे छापे मारण्यात आले आहेत. तसेच पुण्यात त्यांच्या मुलाच्या घरावर व त्यांच्या साडूच्या घरावरही आयकर विभागाने छापा मारला आहे. आयकर विभागाच्या छाप्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे.