उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाचे नेते आणि त्यांच्या साथीदारांवर आयकरच्या छाप्यांमध्ये मोठा खुलासा झाला आहे. आतापर्यंतच्या छाप्यांमध्ये 800 कोटी रुपयांचे घोटाळे आणि करचोरी उघडकीस आली आहे. या छाप्या दरम्यान समाजवादी पक्षाचा एक मोठा नेता आणि त्याच्या कुटुंबीयांच्या परदेशी तिकिटांशी संबंधित कागदपत्रे सापडली आहेत. अशा काही खात्यांबाबतही माहिती मिळाली आहे, जी हटवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
याशिवाय अखिलेश यादव यांच्या जवळच्या मित्राने नोएडामध्ये 92 लाखांना एक वादग्रस्त जमीन खरेदी केली आहे, खरेदी केलेल्या या जमिनीची बाजारात मुळ किंमत 40 कोटी आहे. छाप्यांमध्ये ज्या नेत्यांची नावे समोर आली आहेत त्यात जैनेंद्र यादव, राजीव राय, राहुल भसीन आणि जगत सिंग यांचा समावेश आहे.
दिल्ली-एनसीआर, उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ आणि पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता यासह देशातील सुमारे 30 ठिकाणी आयकर विभागाने मोठे छापे टाकले आहेत. यादरम्यान आयकर विभागाला कोट्यवधी रुपयांच्या अघोषित उत्पन्नाची माहिती मिळाली आहे. आयकर विभागाची ही कारवाई यूपीमधील लखनऊ, मैनपुरी आणि मऊ, बंगालमधील कोलकाता, कर्नाटकची राजधानी बेंगळुरू आणि दिल्ली-एनसीआरमधील जवळपास 30 ठिकाणी करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या छाप्यांदरम्यान आयकर विभागाला बनावट पावत्या, अघोषित गुंतवणूक, स्वाक्षरी केलेले धनादेश आणि अघोषित उत्पन्नाचे पुरावे सापडले आहेत.
86 कोटींच्या अघोषित उत्पन्नाचे पुरावे प्राप्तिकर विभागाला मिळाले आहेत. त्याचवेळी 68 कोटींचे अघोषित उत्पन्न मान्य करण्यात आले आहे. मात्र, दीडशे कोटींच्या रकमेच्या विनियोगाची कागदपत्रे अधिकाऱ्यांना मिळालेली नाहीत. दुसऱ्या अन्य् ठिकाणाहून, आयकर विभागाला 12 कोटींची अघोषित गुंतवणूक आणि 3.5 कोटींची बेनामी मालमत्ता मिळाली आहे.