राजुरीत एकाच दिवशी दोन ठिकाणी चोरीच्या घटना

बेल्हे(प्रतिनिधी):- राजुरी येथे पानसरे मळयात दोन ठिकाणी झालेल्या चोरीत आठ तोळे सोने व वीस हजार रुपयांची रक्कम असा चोरीला गेल्याची घटना बुधवार (दि.१७) पहाटेच्या सुमारास घडली.

याबाबत आळेफाटा पोलीस स्टेशनकडुन मिळालेल्या माहीतीनुसार राजुरी (ता.जुन्नर) येथे मंगळवारी पहाटेच्या सुमारास दोन चो-या झाल्या असुन पहील्या चोरीत पानसरे मळयामधील अशोक पंढरीनाथ पानसरे यांच्या घराची कौले काढुन चोरट्यांनी घरात प्रवेश केला. पहिल्या खोलीतील घरात असलेल्या कपाटातील आठ तोळे सोन्याचे दागीने व रोख रक्कम दहा हजार रुपये असा ऐवज चोरी केला.तर चोरटे दुसऱ्या खोलीत जात असताना या ठिकाणी झोपलेले असलेले अशोक पानसरे यांना अचानक पणे जाग आली असता चोरटे दरवाजा खोलुन पळुन गेले.

तर दुसऱ्या ठिकाणी याच मळयात राहत असलेल्या अंजना बाबुराव पानसरे या आजी एकटया राहत होत्या. चोरटयांणी घराचा दरवाजा तोडुन घरात प्रवेश केला झालेल्या आवाजाने आजी जाग्या झाल्या असता चोरटयांणी आजीचे ओरडु नये म्हणून तोड दाबुन धरले. तर चोरटयांणी कपाट तोडुन कपाटातील दहा हजार रुपयांची रक्कम चोरली तर आजींच्या गळयात असलेले दोन तोळयांचे मंगळसुत्र चोरटयांणी चोरुन नेले.

घटना स्थळी आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सतीश डवले, पोलीस नाईक नरेंद गोराने, पोलीस कॉन्स्टेबल संदीप फड व इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून पोलीस निरीक्षक टि.वाय.मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सतीश डवले करत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.