नागुपरातील झुलॉजिकल पार्कचे उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्‌घाटन

नागपुर – नागपुर मध्ये 1914 हेक्‍टर जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे झुलॉजिकल पार्क उभारण्यात आले असून त्याचे उद्‌घाटन प्रजासत्ताक दिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे.

गोरेवाडा येथे उभारण्यात आलेल्या या आंतरराष्ट्रीय झुलॉजिकल पार्कला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आले आहे. हे देशातले सर्वात मोठे झुलॉजिकल पार्क असणार आहे.

या आधीचे देशातील सर्वात मोठे झुलॉजिकल पार्क 564 हेक्‍टर्स क्षेत्रावरील आहे, त्याच्या सुमारे चौपट अधिक क्षेत्रफळावर हे पार्क उभारण्यात आले आहे. या पार्कमध्ये चार प्रकारच्या सफारी असणार आहेत. या पार्कसाठी अनेक प्रकारचे वाघ आणि अन्य प्राणी संपादित करण्यात आले असून हे प्राणी येथे सोडले जाणार आहेत.

या सफारींसाठी शंभर रूपये ते तीनशे रूपये अशी फी आकारली जाणार आहे. पर्यटकांना त्यासाठी वातानुकुलीत बसेस मधून पार्क मधील वन्य प्राण्यांचे दर्शन घडवले जाणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.