नवी दिल्ली – कोल इंडियाची उपशाखा वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडने महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात आपल्या तीन नव्या खाणी आज सुरू केल्या. या तिन्ही खाणींची एकत्रित वार्षिक उत्पादन क्षमता, 2.9 दशलक्ष मेट्रिक टन इतकी आहे. या तिन्ही खाणींमध्ये कंपनी, एकूण 849 कोटी रुपयांचे भांडवल गुंतविणार असून या खाणींमधून 647 जणांना थेट रोजगार मिळणार आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय कोळसा आणि खाणकर्म मंत्री प्रल्हाद जोशी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते संयुक्तरीत्या विडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून या खाणींचे उद्घाटन झाले.
वेस्टर्न कोलफिल्ड्चे, आर्थिक वर्ष 2023-24 पर्यंत, 75 मेट्रिक टन कोळसा उत्पादन करण्याचे लक्ष्य आहे. या खाणी सुरु केल्यास उद्दिष्टाचा मैलाचा दगड गाठण्यात निश्चितच मदत होईल आणि कोल इंडिया ला वित्तीय वर्ष 2023-24 पर्यंत 1 अब्ज टन कोळसा उत्पादन करण्याचे उद्दिष्ट साध्य करता येईल. असे प्रल्हाद जोशी यांनी यावेळी सांगितले.
आज उद्घाटन तीन खाणींपैकी, आदासा ही महाराष्ट्रात नागपूर जिल्ह्यात आहे. सारडा ही कन्हान भागात आणि धनकसा ही मध्यप्रदेशातील पेंच भागात आहे. आदासा खाणीची वार्षिक उत्पादन क्षमता, 1.5 मेट्रिक टन इतकी आहे आणि सारडा तसेच धनकासा खाणींची वार्षिक क्षमता अनुक्रमे 0.4 आणि 1 मेट्रिक टन इतकी आहे.