देशाच्या पहिल्या खासगी रेल्वेचे लोकार्पण

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दाखवला हिरवा झेंडा
लखनऊ ते दिल्ली मार्गावर धावणार तेजस एक्‍सप्रेस

नवी दिल्ली : देशाची पहिली खासगी रेल्वे देशाच्या सेवेत दाखल झाली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज तेजस एक्‍सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून रेल्वेचे लोकार्पण केले. लखनऊ ते नवी दिल्ली या मार्गावर ही नवीन रेल्वे धावणार आहे. आयआरसीटीसीद्वारे संपूर्णपणे चालविण्यात येणारी ही देशातील पहिली खासगी रेल्वे आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तेजस रेल्वेचे लोकार्पण केले. यावेळी त्यांनी तेजस रेल्वेमधून पहिल्यांदा प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे अभिनंदन केले. तसेच यावेळी त्यांनी तेजस रेल्वे ही देशातील पहिली कॉर्पोरेट रेल्वे आहे. देशात या रेल्वेच्या माध्यमातून अनेक शहरांना विकासासोबत जोडण्यास मदत होणार असल्याचे यावेळी आदित्यनाथ यांनी म्हटले. देशातील पहिली कॉर्पोरेट ट्रेन तेजस एक्‍स्प्रेसमध्ये प्रवाशांसाठी सोयीची असल्याचेही यावेळी त्यांनी म्हटले.

विशेष गाडीचा क्रमांक 00501 आहे. ही गाडी कानपूर आणि गाझियाबाद मार्गे नवी दिल्लीकडे जाईल तर 6 ऑक्‍टोबरपासून ट्रेन नियमितपणे सुरू होणार आहे. रेल्वेचा पहिला प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आयआरसीटीसीतर्फे मोफम भोजन देण्यात येणार आहे. तसेच भेटवस्तूदेखील दिली जाणार आहे. उद्घाटन कार्यक्रमात रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व्ही.के. यादव, आयआरसीटीसी सीएमडी खासदार माल, ईशान्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राजीव अग्रवाल, आयआरसीटीसीचे सीआरएम अश्विनी श्रीवास्तव यांच्यासह अनेक रेल्वे अधिकारी उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.