लालकिल्ल्यावरील सुभाषचंद्र बोस यांच्या संग्रहालयाचे मोदींच्या हस्ते उद्‌घाटन

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दिल्लीतील लालकिल्ल्याच्या परिसरात उभारण्यात आलेल्या सुभाषचंद्र बोस संग्रहालयाचे उद्‌घाटन करण्यात आले. तसेच जालियनवाला बाग आणि पहिल्या जागतिक महायुद्धाच्या अनुषंगाने उभारण्यात आलेल्या याद ए जालियन संग्रहालयाचेही त्यांनी उद्‌घाटन केले.

बोस यांच्या नावाने उभारण्यात आलेल्या संग्रहालयात त्यांच्या इंडियन नॅशनल आर्मीच्या अनेक आठवणी चित्रीत करण्यात आलेल्या आहेत. तसेच आझाद हिंद फौजेच्यावेळी वापरण्यात आलेला पोषाख, नेताजींनी वापरलेल्या वस्तु, पदके इत्यादी साहित्य या संग्रहालयात ठेवण्यात आले आहे. या ठिकाणी पर्यटकांना नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावरील एक माहितीपटही दाखवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जालियनवाला बागेत ब्रिटीशांनी केलेल्या हत्याकांडाच्या घटनेचा इतिहास आणि त्याविषयीची अधिकृत माहिती जालियनवाला संग्रहालयात सादर करण्यात आली आहे. तसेच दृष्यकला संग्रहालयही या ठिकाणी उभारण्यात आले आहे त्यांचे उद्‌घाटनही मोदींच्या हस्ते झाले. यावेळी पंतप्रधानांनी सुमारे तासभर या सर्व संग्रहालयांची पहाणी केली. तत्पुर्वी पंतप्रधानांनी आपल्या ट्‌विटर अकौंटवरून 122 व्या जयंती निमीत्त नेताजींना आदरांजली अर्पण केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)