नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांच्या हस्ते रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ

बारामती – प्रभाग क्रमांक 19 शेंडे वस्ती येथील अंतर्गत रस्ते कॉंक्रिटीकरण करणे तसेच गुजर इस्टेट हरिकृपा नगर अंतर्गत रस्ते व जनहित प्रतिष्ठान शाळा समोरील रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांच्या हस्ते करण्यात आला.

हरिकृपा नगर गुजर इस्टेट येथील नागरिकांची अंतर्गत रस्त्याची मागणी होती. याबाबत माजी उपनगराध्यक्ष व स्थानिक विद्यमान नगरसेवक नवनाथ बल्लाळ यांनी सातत्याने पाठपुरावा केला. अजित पवार यांच्या सूचनेनुसार रस्त्यांच्या कामासाठी निधी उपलब्ध झाला.

कार्यक्रमास उपनगराध्यक्षा तरन्नुम सय्यद, गटनेते सचिन सातव, जेष्ठ नगरसेवक किरण गुजर, नगरसेविका अनिता जगताप, नगरसेवक सत्यव्रत काळे, सिद्धनाथ भोकरे अल्ताफ सय्यद, नगरसेविका सविता जाधव, बांधकाम सभापती संतोष जगताप, नगरसेवक राजेंद्र बनकर,  नगरसेविका मयुरीताई शिंदे, तसेच पत्रकार प्रमोद ठोंबरे, अँड आबा गावडे, निलेश मोरे, पराग गुजर, भाविन गुजर, अमोल वाघमारे, सिद्धार्थ सोनवणे ,युवराज चव्हाण सर , अशोक राऊत, अशोक जगताप मेजर,सोमनाथ आटोळे, अरुण पाटोळे, सागर शीलवंत, विशाल गायकवाड, परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

मागील अनेक वर्षापासून नागरिकांची रस्ते करण्याची मागणी होती. रस्त्याचे काम सुरू करण्यापूर्वी त्या भागांमध्ये पिण्याच्या पाण्याची पाईपलाईनचे काम पूर्ण करण्यात आले आहे. शेंडे वस्ती येथे अंडरग्राउंड लाईट कनेक्शन चे काम तसेच स्ट्रीट लाईट चे टेंडर प्रक्रिया पूर्ण झाले असून सर्वच भागात स्ट्रीट लाईटचे पोल बसवण्याचे काम थोड्या दिवसात सुरू करण्यात येणार असल्याचे नवनाथ बल्लाळ यांनी प्रभातशी बोलताना सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.