पुणे: पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र सरकार यांच्या वतीने आयोजित ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’चे उद्घाटन आज बालगंधर्व रंग मंदिर येथे संपन्न झाले. महोत्सवा’चे उद्घाटन सांस्कृतिक कार्य व वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. दरम्यान जेष्ठ अभिनेते मोहन आगाशे, डॉ. जब्बार पटेल व अन्य अभिनेते उपस्थित होते.
यंदाचा ‘पिफ’ दिवंगत अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांच्या स्मृतीस समर्पित करण्यात येणार असून महोत्सवाच्या प्रमुख प्रवेशद्वारास डॉ. लागू यांचे नाव देण्यात येणार आहे.