नवी दिल्ली – कोची मेट्रोचा थाईकुडम-पेट्टा मार्गाचे आज गृहनिर्माण आणि शहरी कामकाज राज्यमंत्री हरदीपसिंग पुरी आणि केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे केले.
हा मार्ग सुरू झाल्यामुळे केरळ मेट्रोचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे, अशी घोषणा पुरी यांनी केली आहे. या मार्गासाठी 6,218 कोटी रुपये खर्च झाला आहे. कोची मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या सक्रिय विचाराधीन असून लवकरच त्याला मंजुरी मिळेल, असेही पुरी यांनी सांगितले.
थाईकुडम ते पेटा पर्यंतच्या 1.33 किमी लांबीच्या मार्गासह एकूण मार्ग 25.2 किमी असेल. पेट्टा-थाईकुडम मार्ग सुरु झाल्यामुळे कोची मेट्रोला प्रवासी संख्या दररोज एक लाखांहून अधिक वाढवता येऊ शकेल.
जर्मन बॅंक, केएफडब्ल्यूच्या आर्थिक मदतीने केएमआरएल 747 कोटी रुपये खर्च करून कोची जल मेट्रो प्रकल्प राबवण्यासाठी सज्ज आहे. कोची हे देशातील पहिले शहर आहे जेथे मेट्रोला फीडर सेवा म्हणून जलवाहतूक जोडली आहे.
केएमआरएलने एलजीबीटी समुदायामधील व्यक्तींना त्यांच्या कामकाजात सहभागी केले आहे आणि अशा प्रकारे तृतीयपंथीयांची नेमणूक करणारी ही देशातील पहिली संस्था बनली आहे.