भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार प्रदर्शनाचे नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्‌घाटन

नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी आज नवी दिल्लीत 39 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार प्रदर्शनाचे उद्‌घाटन केले. जागतिक बॅंकेच्या व्यापार सुलभतेत 2014 मधल्या 142 व्या स्थानावरून भारताने 63 व्या स्थानावर घेतलेली झेप लक्षात घेऊन या प्रदर्शनाची संकल्पना व्यापार सुलभता ही ठेवण्यात आली आहे.

सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रात भारताने उत्तम प्रगती केल्याचे गडकरी यांनी यावेळी सांगितले. भारताच्या एकूण निर्यातीत सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राचा 29 टक्के वाटा असून एमएसएमई क्षेत्र म्हणजे देशाच्या विकासाचे इंजिन असल्याचे गडकरी म्हणाले.

अनेक राज्यात विपुल खनिज संपदा आणि कच्चा माल आहे. त्याचे व्यापार आणि उद्योग संधीत रुपांतर करायला हवे असे सांगून उद्योजकांनी निर्मिती खर्च कमी करणे, आरेखन यात नव्या कल्पनांसह पुढे यावे असे आवाहन त्यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.