इंदापुरात आमदार निधीतून विकासकामांचे उद्‌घाटन

तालुक्‍यात पाच कोटी 62 लाखांची कामे 

रेडा – इंदापूर तालुक्‍यातील पुनर्वसित गावठाणातील गावांमध्ये 5 कोटी 62 लाखाच्या निधीतून होणाऱ्या विविध विकासकामांचे भूमिपूजन बुधवारी (दि. 31) आणि गुरुवारी (दि. 1 ऑगस्ट) आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते होत आहे.

यावेळी जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्य सभापती प्रवीण माने, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, कृषी उत्त्पन्न बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे, इंदापूर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष महारूद्र पाटील, छत्रपती कारखान्याचे माजी चेअरमन बाळासाहेब घोलप, जिल्हा परिषद सदस्या वैशाली पाटील, अभिजित तांबिले, हनुमंत बंडगर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. बुधवारी दुपारी 3:00 वाजता माळवाडी नं. 1, 3:30 वाजता माळवाडी नं. 2, 4:00 वाजता शिरसोडी, 4:30 वाजता पडस्थळ, 5:00 वाजता अजोती, 5:30 वाजता सुगाव, 6:00 वाजता पिंपरी खुर्द या ठिकाणी भूमिपूजन होणार आहेत.

गुरूवारी सकाळी 9:00 वाजता डिकसळ, 9:30 वाजता तक्रारवाडी, 10:00 वाजता भिगवण, 10:30 वाजता विरवाडी, 11:00 वाजता धुमाळवाडी व कुंभारगाव, दुपारी 12:00 वाजता काळेवाडी नं. 2 या ठिकाणी भूमिपूजन समारंभ होणार आहे. तालुक्‍यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व संबंधित गावातील नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.