साताऱ्यात रिषभमध्ये सुसज्ज सोमानी शोरुमचे उद्‌घाटन 

सातारा – नोएडा येथील सोमानी सिरॅमिक लिमिटेड या कंपनीच्या पश्‍चिम महाराष्ट्रातील भव्य शोरुमचे उद्‌घाटन नवनीत गौर (जनरल मॅनेजर वेस्ट झोन) यांच्या अध्यक्षतेखाली तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या हस्ते सातारा येथे झाले. यावेळी फुलचंद जी जैन यांची प्रमुखी उपस्थिती होती.

सर्वोत्कृष्ट टाइल्स, सॅनिटरी वेअर, बाथ फिटिंग प्रॉडक्‍टस या सर्व उत्पादनात सोमानी कंपनीचा ब्रॅंड भारतात नावाजलेला आहे. मोळाचा ओढा परिसरातील मयूर जैन आणि जवानमल जैन यांना सोमानी कंपनीची पश्‍चिम महाराष्ट्राची जबाबदारी कंपनीने सोपवली आहे. एच. एल. सोमानी यांनी सोमानी सिरॅमिक्‍स ही कंपनी 1969 मध्ये स्थापन केली. कडी (गुजरात), कस्सार (हरियाणा) येथे कंपनीचे उत्पादन करणारे प्रकल्प आहेत.

याशिवाय कंपनीचे भारतात काही संयुक्त प्रकल्प आहेत.या सर्व प्रकल्पांतून दरवर्षी 60 मिलियन स्क्वेअर मीटर एवढे प्रचंड प्रमाणात विविध प्रकारचे उत्पादन करण्याची क्षमता आहे. आकर्षक उत्पादनांचा दर्जा कायम ठेवल्याने ग्राहकांचा विश्‍वास कंपनीने संपादन केला आहे. स्टाईल, दर्जा, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यातून कंपनी सर्वोत्कृष्ट उत्पादन देऊन ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तत्पर आहे. म्हणूनच कंपनीच्या ब्रॅंडच्या उत्पादनांची मागणी भारतभरातून वाढत आहे. सातारकरासाठी आणि पश्‍चिम महाराष्ट्रात मयूर जैन आणि जवानमल जैन यांच्या शोरुममधून सर्वांसाठी आता सोमानी उत्पादनांचे सुसज्ज दालन खुले झाले आहे.

शोरूम उद्‌घाटन प्रसंगी शाहूपुरी पोलीस निरीक्षक एम. बी. पाटील, बिल्डर असो. इंडिया साताराचे अशोक शिंदे, संजय कुलकर्णी, विवेक निकम, राजेश माने, अयाती टपले, मयूर गांधी, सिध्दाथ कोल्हापुरे, नीलेश शिंदे मंगेश जाधव, दीपक पाटील, संजय राजेमहाडीक, मिलिंद चोरगे, श्री. महाजनी, गौतम भुरके, सुहास तळेकर जैन सोशलचे राजन मामनिया, मांगीलाल कोठारी, शैलेश दोषी, जीनेद्र गुगळे, सचिन पाटील, मनोज ओसवाल, किर्ती कुमार, नरेंद्र गांधी, जयेश मुथा, सी. व्ही. भाटे, सोमानी कंपनीचे मनोज मोहंती (पुणे शाखा मॅनेजर), विजय जाधव, अमित चौगुले उपस्थित होते.
रिषभ ट्रेडिंग कंपनीचे सोनाराम चौधरी, अमर कणसे, अरविंद सिंह, रतन सिंह, भवानी सिंह, राजु सिंह, रमेश देसाई, वगता देसाई, सूरज जैन, अनंत अहिरे यांचे सहकार्य लाभले. मयूर जैन यांनी सर्वांचे आभार मानले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)