नवी दिल्ली – यंदाच्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपने पश्चिम बंगालमध्ये आपली सर्व ताकद पणाला लावली होती. निवडणूक प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या दरम्यान चांगलीच चुरस देखील पाहायला मिळाली होती.
दरम्यान पश्चिम बंगालमध्ये मतदान मोजणीला सुरुवात झाली असून येथील 42 लोकसभा मतदारसंघांमधील सुरुवातीचे कल हाती आले आहेत. सुरुवातीच्या कलानुसार पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचे तृणमूल काँग्रेस सध्या सर्वाधिक 25 जागांवर आघाडीवर असून त्यापाठोपाठ भाजप 16 जागांवर तर काँग्रेस एका जागेवर आघाडीवर असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.