पश्‍चिम बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्याचे घरातील गवत पेटवले

तहेरारपूर (पश्‍चिम बंगाल) – पश्‍चिम बंगालमध्ये नादिया जिल्ह्यातल्या भाजपच्या कार्यकर्त्याच्या घरातील गवताच्या साठ्याला तृणमूल कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काल आग लावली. मात्र तृणमूल कॉंग्रेसने हा आरोप फेटाळला आहे.

चिना मोंडल या महिलेने याबाबतची तक्रार तहरानपूर पोलिस ठाण्यामध्ये नोंदवली आहे. चिना मोंडल यांचे पती शंभू हे भाजपचे कार्यकर्ते आहेत. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास तृणमूलच्या काही कार्यकर्त्यांनी राजकीय वैमनस्यातून घरातील गवत पेटवून दिले, असे या तक्रारीमध्ये म्हटले आहे. घटना घडली तेंव्हा चिना यांचा रिक्षा चालक मुलगा घरी परतत होता. त्याने तृणमूलच्या काही कार्यकर्त्यांना पळून जाताना बघितले.

गवताला लावलेली आग शेजाऱ्यांच्या मदतीने लगेच आटोक्‍यात आणण्यात आली. आग अधिक पसरली असती, तर घरही पेटले असते, असे तक्रारीमध्ये म्हटले आहे.

शंभू मंडल यांना यापूर्वी भाजपला पाठिंबा दिल्यास गावातून हाकलून देण्याची धमकी तृणमूलच्या कार्यकर्त्यांकडून दिली गेली होती. आगीच्या प्रकरणाचा तपास पोलिस करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.