उत्तराखंड – उत्तराखंडमधील पौरी जिल्ह्यातील काबरा गावाजवळील दरीत बस कोसळली असुन या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू तर 16 जण जखमी झाले आहेत. घटनास्थळी एसडीआरएफचे पथक दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे. काही दिवसांपुर्वीच यमुना एक्स्प्रेस वे वर देखील एक बस खोल नाल्यात कोसळली होती. या दुर्घटनेत 20 पेक्षा अधिक जणांना जीव गमवावा लागला होता.