उत्तरप्रदेशात सरकारी निवेदने आता संस्कृतमध्येही

लखनौ – भारतातील प्राचीन संस्कृत भाषेला प्रोत्साहन देण्यासाठी उत्तरप्रदेश सरकारने आपली प्रसिद्धी निवेदने आता संस्कृत भाषेतूनही प्रकाशित करण्याचा निर्णय घोषित केला आहे. सध्या ही निवेदने हिंदी, इंग्रजी आणि उर्दू भाषेतून काढली जातात त्यात आता संस्कृत भाषेतील निवेदनांचीही भर पडणार आहे. सरकारची संस्कृत भाषेतील पहिली प्रेस नोट आज माहिती विभागातर्फे प्रसिद्धीला देण्यात आली.

माहिती विभागाने म्हटले आहे की मुख्यमंत्री योगी यांची महत्वाची भाषणे आणि अन्य सरकारी महत्वाची माहितीही संस्कृत भाषेतूनही लवकरच प्रकाशित केली जाणार आहेत. यासाठी लखनौ येथील राष्ट्रीय संस्कृती संस्थानची मदत घेतली जाणार आहे. माहिती विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले की मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनी निती आयोगाच्या बैठकीत केलेल्या भाषणाचा संस्कृत सारांश नुकताच प्रसिद्धीला देण्यात आला त्याचे चांगले स्वागत झाले आहे.

संस्कृत भाषा हाच भारताचा मुख्य डीएनए आहे आणि ही भाषा केवळ धर्माचार्यांपुरती मर्यादित राहता कामा नये अशी मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे. उत्तरप्रदेशात संस्कृत भाषेतील 25 नियतकालिके प्रसारीत होत असतात.

Leave A Reply

Your email address will not be published.