शोधण्याचे महसूल विभागापुढे आव्हान
न्हावरे (वार्ताहर) – उरळगाव (ता.शिरूर) येथील दोन्ही रेशन दुकानदार यांच्या मनमानी कारभाराची चौकशी होऊन संबंधित दुकानदारांवर कारवाई व्हावी. अन्यथा येथील रेशनिंगचे लाभार्थी व उरळगावकर ग्रामस्थ तीव्र आंदोलन करतील असा इशारा येथील तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष तुकाराम रामचंद्र गिरमकर व युवक कार्यकर्ते संजय जांभळकर व ग्रामस्थांनी दिला आहे.
यासंबंधीचे ग्रामस्थांच्या सह्यांचे निवेदन आमदार अशोक पवार व शिरूरच्या तहसीलदार कार्यालयात दिले आहे. उरळगाव येथे जयवंत दिनकर गिरमकर व शोभा तुकाराम गिरमकर हे दोघेजण गेली अनेक वर्षांपासून अधिकृत रेशनदुकानदार म्हणून कामकाज पहात आहे.या दोन्हीही दुकानदांराच्या कामकाजाबाबत काही रेशन लाभार्थ्यांच्या बाबत तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
गावातील मयत व्यक्ती तसेच परगावी गेलेल्या लाभार्थ्यांच्या नावावरही हे दुकानदार धान्याची पावती करून ते धान्य हडप करत आहे .तसेच लाभार्थ्यांची वेळोवेळी कायम पिळवणूक करत आहे. धान्य असून ही धान्याचा कोठा संपल्याचे सांगून फसवणूक करत आहे, असे निवेदनात ग्रामस्थांनी दुकानदारांवर ठपका ठेवला आहे. तरी या दोन्ही रेशनिंग दुकानदारांच्या कामकाजाची सबंधित विभागाने सखोल चौकशी करून त्यांच्यावर अधिकृत रेशनींगचे परवाने रद्द करून कारवाई करण्यात यावी अन्यथा येथील लाभार्थी व उरळगावकर नागरिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष तुकाराम गिरमकर व संजय जांभळकर यांनी इशारा दिला आहे