युपीमध्ये जनतेसह पोलीसदेखील असुरक्षित

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात चकमकीदरम्यान आठ पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. यामध्ये पोलीस उपअधीक्षकाचाही समावेश आहे. कानपूर येथे पोलीस विकास दुबे या गुंडाला अटक करण्यासाठी गेली असता ही चकमक उडाली. विकास दुबे याच्यावर ६० हून अधिक गुन्हे दाखल आहेत. पोलीस बिकरु गावात विकास दुबेच्या शोधात गेले असता गुंडांकडून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. यामध्ये पोलीस उपअधीक्षकासह आठ पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. याच प्रकरणी काँग्रेसच्या महासचिव  प्रियांका गांधी यांनी ट्विट करत  मुख्यमंत्री  योगी आदित्यनाथ यांचावर निशाणा साधला आहे.

ट्विट करत म्हणाल्या प्रियांका गांधी

“आरोपीला पकडण्यासाठी गेले असता पोलिसांवर गोळीबार करण्यात आला. यामध्ये आठ पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. उत्तर प्रदेशातील शहीद पोलिसांच्या कुटुंबीयांबद्दल मी संवेदना व्यक्त करते. उत्तर प्रदेशातील कायदा आण आणु सुव्यवस्था खालावली आहे. गुन्हेगारांची भीती संपली आहे”.


त्या पुढे म्हणाल्या,’सर्वसामान्य जनता आणि पोलीसदेखील सुरक्षित नाहीत. मुख्यमंत्र्यांकडे कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी आहे. इतक्या गंभीर घटनेनंतर त्यांनी कडक कारवाई केली पाहिजे. यामध्ये अजिबात हलगर्जीपणा नको,” असंही प्रियंका गांधी यांनी म्हटलं आहे.’असे म्हणत  त्यांनी  संताप व्यक्त केला आहे

Leave A Reply

Your email address will not be published.