नवी दिल्ली – सध्या जगातील अनेक देशात करोनाचा प्रभाव झपाट्यापे वाढत आहे. दररोज मोठ्या संख्येने नवीन करोनाबाधित सापडत आहे. करोनची हीच दुसरी लाट रोखण्यासाठी सर्वच देशांनी करोनाचे लसीकरण वेगाने वाढविले आहे. भारतात दर दिवशी सरासरी 30 लाख 93 हजार 861 जणांचं लसीकरण सुरू आहे. तर काहीजण करोना लसीचे दुष्परिणाम असल्याचे पाहून लस घेण्यास टाळाटाळ करत आहे.
Chhattisgarh: Tomatoes being offered to people in Bijapur Municipal limits, by Municipality, to encourage them to get vaccinated for #COVID19. An official, Purshottam Sallur says, “It’s being done to encourage them. We appealed to vegetable vendors, they supplied to municipality” pic.twitter.com/3LHPKfm6Mr
— ANI (@ANI) April 20, 2021
अश्यातच आता नागरिकांनी लवकरात लवकर करोना लस घ्यावी यासाठी छत्तीसगड राज्यातल्या बीजापूर जिल्हा प्रशासनाने भन्नाट आयडिया लढविली आहे. करोना लसीकरण केंद्रामध्ये येणाऱ्या नागरिकांना एक खास गिफ्ट देण्यात येत आहे. करोना लस टोचू घेतल्यानंतर त्यांना दोन किलो टोमॅटो मोफत मिळणार असल्याची मोहीम चालविण्यात येत आहे.
मिळलेल्या माहितीनुसार, छत्तीसगड राज्यातल्या बीजापूर जिल्हा प्रशासनाने लोकांनी कोरोना लस घेण्यासाठी पुढाकार घ्यावा म्हणून भन्नाट आयडिया लढविली आहे. आरोग्य विभागाच्या मदतीने “लस घ्या आणि दोन किलो टोमॅटो मोफत मिळवा” असं अभियाना सुरू केलं आहे. या अभियानाअंतर्गत कोरोनी लस घेतल्यानंतर नागरिकांना 2 किलो टोमॅटो मोफत दिले जात आहेत. टोमॅटोसाठी का होईना लोकांनी लसकरण केंद्रावर गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे. जिल्ह्याचे प्रशासकीय अधिकारी पुरूषोत्तम सल्लूर यांनी एएनआय वृत्तसंस्थेला याबाबत माहिती दिली आहे.
दरम्यान, प्रत्येक देश लसीकरणासाठी जनतेला आवाहन करत आहे, भारतातील गुजरात येथील राजकोटमध्ये ज्वेलर असोसिएशनने स्वतःहून पुढाकार घेत महिलांनी करोना लस टोचू घेतल्यानंतर त्यांना सोन्याची नथ गिफ्टम्हणून दिली जात आहे. तर पुरुषांना हँडब्लेंडर देण्यात येत आहे. सध्या देशासह अनेक राज्यांमध्ये करोना या घातक विषाणूने पुन्हा एकदा आपले पाय घट्ट करण्यास सुरुवात केली आहे.