मुंबई – विधानपरिषदेच्या पुणे विभाग शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील पाच जागांवर महाविकास आघाडीने विजय मिळवला आहे. पुणे पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड यांचा दणदणीत विजय झाला आहे. तर बालेकिल्ला समजला जाणारा नागपूर पदवीधर मतदारसंघातही भाजपाला धक्का बसला आहे. यानंतर राष्ट्रवादी नेते रोहित पवार यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असली तरी #मविआ साठी निष्ठेची होती.राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस व शिवसेनेसह सहयोगी पक्षांच्या तळागाळातील कार्यकर्त्यांनी एकमेकांबद्दल दाखवलेली निष्ठाच आज कामी आली.या निवडणुकीत जनतेने #मविआ ची मनातील जागा कायम ठेऊन भाजपला त्यांची ‘जागा’ दाखवून दिली.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) December 4, 2020
काय म्हणाले रोहित पवार