भारतीय लोकांना स्वतःच्या देशातच शरणार्थी बनवण्याचे काम- ममता बॅनर्जी

ममता बॅनर्जींनी जाहीर केली आसामच्या नागरिकांची यादी

कोलकात्ता: पूर्वेकडील राज्यांमधून देशात मोठ्या प्रमाणावर घुसखोरी होत असते. यावर चाप बसावा म्हणून आसामचे नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझनशिप (NRC) प्रसिद्ध करण्यात आले आहे. यानुसार आसाममधील २.८९ कोटी लोकांचे नागरिकत्व वैध आहे तर तब्बल ४० लाख लोकांचे नागरिकत्व अवैध आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मात्र, ममता बॅनर्जी यांनी आसाममधील नागरिकांची यादी जाहीर करत ही एनआरसी नाकारली आहे. भारतीय लोकांना त्यांच्या स्वतःच्या देशातच शरणार्थी बनवत असल्याचा आरोप बॅनर्जी यांनी भाजपवर केला आहे.

ममता बॅनर्जी म्हणाल्या, “या संदर्भात गृहमंत्री राजनाथसिंह यांना भेटण्याचा प्रयत्न करेल. तसेच आसाममध्ये पक्षाच्या खासदारांची एक टीम पाठवत असून गरज पडल्यास मी सुद्धा जाईल, ज्या लोकांना परदेशी म्हणून ओळखले गेले आहे त्यांना परत पाठवले जाईल. त्यांच्यात बरेच मुले आणि महिला आहेत.”, असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, एनआरसी प्रसिद्ध झाल्यांनतर तब्बल ४० लाख लोकांचे नागरिकत्व अवैध आल्याने त्यांची निर्वासित होण्याची शक्यता आहे. परंतु या ४० लाख लोकांना निवार्सित करणार नसल्याचे आश्वासन आसाम सरकारमार्फत देण्यात आले आहे. तसेच हा ड्राफ्ट आहे अंतिम सूची नव्हे, असेही सरकारकडून सांगण्यात आले आहे. या लोकांना आपले नागरिकत्व सिद्ध करण्याची आणखी एक संधी दिली जाणार असून त्यांना ३० ऑगस्टपासून ते २८ सप्टेंबरपर्यंत एक फॉर्म भरावा लागणार आहे. यामध्ये तुमचे नागरिकत्व अवैध का ठरले याचे स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)