अकलूज – करोनामुळे राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर जनसेवा संघटनेचे नेते डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांनी स्वतःरक्तदान करून जनतेला रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे.
या आवाहनास अनुसरून जनसेवा संघटनेच्या 1 हजार कार्यकर्त्यांनी रक्तदान करून या राष्ट्रीय आपत्ती मध्ये सहभागी व्हायचे ठरवले आहे, त्याच अनुशंगाने रविवारी (दि. 12) गिरझणी या ठिकाणी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 165 जणांनी रक्तदान केले.
या शिबिरात सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील ब्लड बॅंकेचे सहकार्य लाभले. या शिबिराचे आयोजन शंकरराव मोहीते पाटील बॅंकेचे अध्यक्ष सतीश पालकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
माजी सरपंच विजय माने, हरी माने, कांता पवार, रमेश पवार, अजिनाथ जाधव, मोहन चव्हाण, शंकर चव्हाण, मयुर माने यांनी या शिबिरासाठी विशेष परिश्रम घेतले.