देवले येथे दुमदुमतोय हरिनामाचा गजर
कार्ला – यंदा विठूरायांचा गजर करीत आषाढी वारीला पायी जाता न आल्याने राज्यातील वारकरी चिंतेत आहेत. मात्र त्यावरही मानसिक समाधाव मिळावे म्हणून देवले गावातील वारकऱ्यांना करोनामुळे पंढरपूरवारी करता आली नाही; परंतु ही सेवेचे व्रत सुरू ठेवण्यासाठी तो भक्तीमय वारीचा आनंद मिळवण्यासाठी देवले येथे दररोज हरिनामाचा गजर केला जात आहे.
आषाढी वारीला पांडुरंगच्या चरणी पायी नाही गेले तरी मनापासून त्याची 15 दिवस सकाळी काकड आरती, भजन, हरिपाठ या सर्व सेवा देवले गावातील रोज हरिपाठ करणारे दरवर्षी वारीला जाणारे भजन करणारे यांनी हा उपक्रम अखंड सुरू ठेवला आहे. विठ्ठल भक्तीचा आनंद घेतला जात असून, हे सर्व नियमानुसार सोशल डिस्टन्सिंग ठेऊन व तसेच पांडुरंग चरणी करोनामुक्तीचे साकडे घातले जात आहे.
दररोज मंदिरात 30 ते 40 वारकरी असतात. हा हरिनाम गजर आषाढी एकादशीपर्यंत अखंड सुरू राहणार आहे, तसेच या उपक्रमाचे ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, पाटील व परिसरातील ग्रामस्थांकडून प्रशंसा होत आहे.