नवी दिल्ली – महाराष्ट्राच्या राजकारणाला वळण देणारी व राज्यात महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आणणाऱ्या राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांची साताऱ्यातील पावसातील सभा चांगलीच गाजली होती. अशीच एक सभा आता अमेरिकेत झाली आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठी डेमोक्रॅटिक पक्षाकडून जो बाइडेन यांची पावसातील सभा चांगलीच गाजत आहे.
Joe Biden finishes speech in Tampa today in the rain, and then jogs off of the stage. Another thing Joe can do that Trump can’t because 🍊 is too scared to get his hair wet 😂 pic.twitter.com/Z4bmn6CpF2
— ✊🏾ALL BLACK LIVES MATTER✊🏾 (@flywithkamala) October 29, 2020
बाइडेन यांच्या भाषणावेळी वादळी पाऊस झाला. मात्र या पावसातही बाइडेन यांनी जोरदार भाषण केले. गर्दी जमून करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी समर्थकांना कार घेऊन रॅलीला उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या रॅलीचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
बाइडेन यांच्या भाषणाच्या व्हिडीओनंतर अनेक युझर्सला माजी अध्यक्ष बराक ओबामांच्या १२ वर्षांपूर्वीच्या भाषणाची आठवण झाली आहे. बाइडेन यांनीदेखील त्यांच्या ट्विटर हॅडलवरून सभेतील फोटो ट्विट केला असून हे वादळ जाईल आणि नवा दिवस येईल, अशी कॅप्शन त्यांनी दिली आहे.
Obama & Biden in the rain.
Exactly twelve years to the day. pic.twitter.com/QcdvWYmx9w
— Matt McDermott (@mattmfm) October 30, 2020
दरम्यान, अमेरिकेत तीन दिवसांनंतर मतमोजणी होणार आहे. यामुळे अमेरिकेचे अध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि जो बाइडेन यांनी प्रचारचा धडाका लावला आहे. नुकत्याच दोन्ही नेत्यांच्या फ्लोरिडामध्ये सभा झाल्या असून रिपब्लिकन पक्षाचे सरकार पुन्हा आणण्यासाठी फ्लोरिडा राज्य महत्त्वाचे आहे. तर बाइडेन यांनीही फ्लोरिडात जोर लावला आहे.