ऐन गरमीत मराठमोळ्या केतकीने वाढवला पारा; सोशलवर बोल्ड लूक व्हायरल!

मुंबई – आपल्या मधुर सुरांनी तरुणाईला मोहून टाकणाऱ्या गायकांपैकी आघाडीचं नाव म्हणजे ‘केतकी माटेगावकर’. केतकी सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह असते. ती नेहमीच आपल्या इंस्टाग्रामवर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करते असते. फॅन्स देखील तिच्या फोटोंवर लाईक्सचा पाऊस पाडत असतात.

लोभसवाणा चेहरा आणि स्मित हास्यामुळे केतकी तरुणांच्या गळ्यातील ताईत बनली आहे. एरव्ही सिंपल लूकमध्ये पाहायला मिळणाऱ्या केतकीने नुकतंच आपला एक हॉट अँड बोल्ड फोटो सोशलवर शेअर केला आहे. तिचा हा हॉट अंदाज पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

केतकीने आजवर केवळ मराठी चित्रपटांमध्येच अभिनय केला असला, तरी अमराठी प्रेक्षकांनाही तिच्या गाण्यांनी वेड लावलं आहे. कोवळ्या वयातील प्रेमभावनांचा प्रवास उलगडणाऱ्या ‘शाळा’ या चित्रपटातून या अभिनेत्रीने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.

केतकी माटेगावकरला २०१२ साली ‘काकस्पर्श’ या मराठी चित्रपटातील भूमिकेबद्दल, मराठी इंटरनॅशनल फिल्म ॲन्ड थिएटरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. ‘टाईमपास’ चित्रपट केतकीचा सर्वात हिट चित्रपट ठरला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.