दक्षिणेत आज सायंकाळी प्रचाराच्या तोफा थंडावणार

प्रचाराची रणधुमाळी संपणार ; सभा, प्रचार फेऱ्यांचे आयोजन

नगर: गेल्या अठरा दिवसापासुन सुरू असलेली प्रचाराची रणधुमाळी आह संपणार असून, प्रचाराच्या सामारोप प्रसंगी सभा,प्रचार रॅली चे आयोजन उमेदवारांच्या वतीने करण्यात येत आहे. निवडणुकिच्या तिसऱ्याटप्प्यासाठी दि.23 मे रोजी मतदान होणार असून. या लोकसभा निवडणूकीत एकुण 20 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत.
गेल्या आठरा दिवसात पंतप्रधान मोदी, शरद पवार व अन्यमान्यवरांच्या सभांनी वातावरण ढवळून निघाले. यावेतीरीक्त उमेदवारांच्या प्रचार फेऱ्या, वयक्तीक गाठी भेटी घरगुती स्वरूपाच्या बैठका त्यातून होणारे आरोप प्रत्यारोपाचा झडलेल्या फैरी उत्तरे-प्रत्युत्तरे यांनी वातावरण ढवळून निघाले.

आता प्रचाराच्या समारोपासाठी पाथर्डी येथे राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्यासाठी धनंजय मुंडे हे दुपारी 1 वाजता जाहीर सभा घेणार आहेत. तर नगर शहरात प्रत्येक प्रभागातील कार्यकर्ते प्रचार फेरी काढुन जगताप यांचा प्रचार करणार असून सायंकाळी स्थानिक नेत्यांची प्रचाराचा समारोपाची सभा आयोजित करण्यात आली आहे. तर नेवासा येथे लक्ष्मी मंगलकार्यालयात सकाळी 9 वाजता माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची सभा होणार आहे.
भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्या प्रचारार्थ कालच दि.20 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी कर्जत येथे जाहीर सभा घेतली. त्यांच्या ही कार्यकर्त्यांच्या प्रचार फेऱ्या आज निघणार आहेत.

नगर दक्षिण मतदार संघात एकूण 18 लाख 54 हजार 248 मतदार मतदान करणार आहेत.यासाठी संपूर्ण मतदार संघातून 2 हजार 30 ठिकाणी मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. त्याठिकाणी सर्व प्राथमिक सुविधा तसेच मतदारांना उभे राहण्यासाठी सावली आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली असून या मतदार संघात एकूण 10 सखी मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. मतदारांना मतदान करण्यासाठी पासपोर्ट, वाहनचालक परवाना, छायाचित्र असलेले ओळखपत्र, बॅंक पासबुक, पॅन कार्ड, नरेगा अंतर्गत दिलेले स्मार्ट कार्ड, आरोग्य विमा कार्ड, छाया चित्र असलेली निवृत्ती वेतन दस्ताऐवज, आणि आधार कार्ड या पैकी कोणतेही ओळखपत्र मतदान करण्यासाठी आवश्‍यक राहील.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.