सातारा : कोयना कोविड सेंटर कराडकरांच्या सेवेत

पुण्यातील तज्ज्ञ डॉक्‍टर करणार उपचार; ऑक्‍सिजनचे 30 बेड
कराड (प्रतिनिधी) –
कराड तालुक्‍यातील वाढता करोनाचा प्रार्दुभाव, बेड अभावी लोकांचे होणारे हाल आणि मृत्यू रोखण्यासाठी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समिती सदस्य नामदेव पाटील, सेवानिवृत्त उत्पादन शुल्क अधिकारी जे. डी. पाटील व त्यांचे चिरंजीव डॉ. प्रवीण पाटील यांच्या पुढाकाराने जनता बॅंकेशेजारी 30 ऑक्‍सिजन बेडचे कोयना कोविड सेंटर सुरू होत आहे. पुणे येथील तज्ज्ञ डॉक्‍टरांची टीम येथे उपचार करणार आहे. या सेंटरची पाहणी नुकतीच आ. चव्हाण यांनी केली.

सातारा जिल्ह्याचा हॉटस्पॉट ठरलेला कराड तालुक्‍यात करोना महामारी नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासकीय पातळी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, बाधितांचे वाढते प्रमाण येथील आरोग्य यंत्रणेसाठी डोखेदुखीचा विषय बनला आहे. अशा वेळी कोविड सेंटर उभारून लोकांचे प्राण वाचवण्यासाठी अनेक हात पुढे येत आहेत.

येथील पंचायत समिती सदस्य नामदेव पाटील यांच्या संकल्पनेतून तसेच सेवा निवृत्त उत्पादन शुल्क अधिकारी जे. डी. पाटील व त्यांचे चिरंजीव डॉ. प्रवीण पाटील यांच्या सहकार्याने येथील जनता बॅंकेनजीक 30 ऑक्‍सिजन बेडचे कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. येथील सर्व तयार पूर्ण झाली आहे. या सेंटरमध्ये पुणे येथील तज्ज्ञ डॉक्‍टर करोनाबाधित रूग्णांवर उपचार करणार असल्याचे डॉ. प्रवीण पाटील यांनी सांगितले. यावेळी बोलताना आ. चव्हाण म्हणाले, करोना महामारीवर जगाच्या पाठीवर कोठेही रामबाण औषध नाही. लस शोधण्याचे काम सुरू आहे. लस येईपर्यंत करोनाबाधित होणाऱ्यांवर उपचार होणे आवश्‍यक आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.