#EngvInd : आवड संपलेल्या शास्त्रींना डुलक्‍यांसाठी सवड

लंडन – इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा डाव संकटात असताना मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री मात्र ड्रेसिंगरूममध्ये डुलक्‍या घेताना दिसले. त्यामुळे आता त्यांच्यावर टीका सुरू झाली आहे. शास्त्री यांना आता संघाच्या विजय व पराभव याचा काहीही फरक पडत नसल्यानेच ते झोपा काढत आहेत, अशा शब्दांतही त्यांना ट्रोल केले जात आहे.

या दोन्ही संघांमध्ये पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना लॉर्डसच्या मैदानावर सुरू होता. या सामन्यातील तिसऱ्या दिवशी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री संघाची वाताहत सुरू असताना चक्क ड्रेसिंगरुममध्ये डुलक्‍या घेताना दिसून आले.

त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. येत्या काही दिवसांत भारतीय क्रिकेट संघामध्ये मोठे बदल होणार आहेत. टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेनंतर शास्त्री यांचीही मुदत संपत आहे.

शास्त्री यांच्यासह सपोर्ट स्टाफमधील फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड, गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर हे देखील आपल्या पदावरून दूर होणार आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.