सुलतान अझलन शहा हॉकी स्पर्धेच्या दुसऱ्या सामन्यात कोरियाने भारताला बरोबरीत रोखले

मलेशिया – सुलतान अझलन शहा हॉकी स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात भारताला बरोबरीत समाधान मानावे लागले आहे. दक्षिण कोरिया विरुद्धच्या सामन्यात भारताने १-१ अशी बरोबरी साधली. कोरियाविरुद्धच्या सामन्यात भारताने १-० अशी आघाडी घेतली होती. परंतु सामन्याच्या अंतिम वेळेपर्यंत भारताला ही आघाडी कायम ठेण्यात अपयश आले. सामन्यातील दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीच्या काही मिनीटांमध्ये मनदीप सिंहने गोल करत भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. मात्र शेवटच्या मिनिटामध्ये लागोपाठ मिळालेल्या दोन पेनल्टी कॉर्नरवर दक्षिण कोरियाच्या जँग जाँगह्यूनने गोल करत आपल्या संघाला १-१ अशी बरोबरी साधून दिली.

मलेशिया येथे सुरु असलेल्या सुलतान अझलन शाह हॉकी स्पर्धेची सुरुवात दिमाखदार करत भारताने शनिवारी आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्ण पदक विजेत्या जपानला २-० अंकाने नमवले होते. त्यामुळे भारतीय संघाचे मनोबल वाढले होते. मात्र आज कोरिया विरुद्धच्या सामन्यात आघाडी घेऊन सुद्धा सामन्याच्या शेवटपर्यंत ही आघाडी कायम ठेण्यात अपयश आल्याने भारतीय हॉकी संघाला आज बरोबरीत समाधान मानावे लागले. यांच्यानंतर भारताचा पुढील सामना यजमान मलेशिया विरुद्ध होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.