सौदी अरेबियात दोन भारतीयांचा शिरच्छेद

रियाध – पंजाबमधील होशियारपूर आणि लुधियाना येथील दोघांना आपल्याच भारतीय सहकार्याच्या हत्येप्रकरणी सौदी अरेबिया प्रशसनाने शिरच्छेदाची शिक्षा दिली. याबाबत भारत सरकारला काहीही कळवलेले नाही. सतविंदर कुमार आणि हरजित सिंग अशी त्यांची नावे असून, सतविंदर होशियारपूरचा आहे, तर हरजित लुधियानाचा आहे. शिक्षेच्या अंमलबजावणीनंतर भारतीय दूतावासाने दोघांच्याही कुटुंबीयांना ही माहिती कळवली.

हरजित, सतविंदर आणि इमामुद्दीन या तिघांनी येथील महामार्गावर लूटमार केली होती. त्यानंतर पैशांच्या वाटणीवरून झालेल्या भांडणात इमामुद्दीनची हत्या झाली होती. त्यांच्यावर खटला चालवून 28 फेब्रुवारीला त्यांचा शिरच्छेद केला गेला; पण याची माहिती भारतीय दूतावासाला देण्यात आली नव्हती.
सतविंदरची पत्नी सीमारानी हिने परराष्ट्र मंत्रालयाकडे संपर्क साधल्यानंतर भारतीय दूतावासाने सौदी प्रशासनाशी संपर्क साधून मृत्युदंडाची माहिती मिळवली. सौदी कायद्यानुसार त्यांचे मृतदेह भारतात पाठवले जाणार नाहीत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.