धूम या चित्रपटाच्या तीन सिरीज आणून काही काळाचा गॅप घेतल्यानंतर आदित्य चोप्रा आता “धूमची चौथी आवृत्ती घेऊन येत आहेत. या चित्रपटात मुख्य भूमिकेत कोण असणार याविषयी बरीच चर्चा मागील काळात झाली आहे. पण आता या चर्चांना पूर्णविराम मिळाल्याचं दिसत आहे. या चित्रपटात आता आमीर खाननंतर मुख्य भूमिकेत बॉलीवूडचा खिलाडी अक्षयकुमारच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं कळतं आहे.
अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान आदित्यने याविषयीची माहिती दिली आहे. अक्षयने 2.0 या चित्रपटात साकारलेला खलनायक सर्वांनाच भावला होता. त्यामुळेच धूम-4 साठी अक्की परफेक्ट असल्याचे आदित्यने ठरवले आणि त्यानुसार अक्षयची निवड केली असण्याची शक्यता आहे. या भूमिकेसाठी आदित्य आणि अक्षय दोघांच्या बरीच चर्चा झाली आहे. आदित्यने अक्षयला चित्रपटाची स्क्रिप्टही पूर्णपणे सांगितली आहे.
या चित्रपटातील मुख्य भूमिकेत असणारी व्यक्ती ही अंडरवर्ल्ड डॉन असणार आहे. तथापि, मागील चित्रपटांपेक्षा या चित्रपटात वेगळेपण आणण्यासाठी “धूम-4′ मधील खलनायक हा कूल आणि अनोखा असणार आहे. या वर्षाच्या अखेरीपर्यंत चित्रपटाविषयीची अंतिम घोषणा होईल अशी अपेक्षा आहे.