हिंदी चित्रपटांमध्ये अनेक कलाकार छोट्या-मोठ्या भूमिकांमुळेही प्रेक्षकांच्या दीर्घकाळ लक्षात राहतात. काही वेळा या भूमिका विनोदी धाटणीच्या असतात, तर काही वेळा भावनाशील असतात, तर कधी हटके लूकमुळे हे कलाकार आपली छाप उमटवून जातात. अभिनेत्री रत्ना पाठकचेही असेच आहे.
#RatnaPathakShah to play @RanveerOfficial’s mother in #JayeshbhaiJordaar – https://t.co/2HZIMBXBNr#ShaliniPandey #ManeeshSharma #DivyangThakkar @JJ_TheFilm pic.twitter.com/lsJQcIjFhd
— Yash Raj Films (@yrf) January 30, 2020
वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये दुय्यम दर्जाच्या भूमिका करतानाही रत्नाने आपला एक वेगळा ठसा उमटवला आहे. आता लवकरच ती बॉलीवूडचा आघाडीचा अभिनेता रणवीर सिंग याच्या आईच्या भूमिकेत दिसणार आहे. “जयेश भाई’ या रणवीर अभिनीत चित्रपटातील माता-पित्यांच्या नावावर नुकतेच शिक्कामोर्तब झाले असून वडिलांच्या व्यक्तिरेखेसाठी बोमन इराणीची निवड करण्यात आली आहे.
दिव्यांग ठाकूर हे या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शनाच्या क्षेत्रात नशीब आजमावत आहेत. रत्नाला या चित्रपटात घेण्यासाठी तो खूप आग्रही होता. “जयेश भाई’ हा चित्रपट यशराज बॅनरअंतर्गत तयार केला जात आहे. या वर्षाच्या मध्यावधीनंतर हा चित्रपट प्रदर्शित होईल असे सांगितले जात आहे.