आंतरराष्ट्रीय बाजारात गव्हाच्या किंमतीत 40 टक्के वाढ
पिंपरी – जागतिक पातळीवरील घडामोडी आणि वाहतूक खर्चात झालेल्या वाढीमुळे किरकोळ बाजारात गहू 15 ते 16 टक्क्याने महागला आहे. चार महिन्यांपूर्वी 24 रुपये किलो दराने विकला जाणारा गहू सध्या 28 रुपये किलो या दराने विकला जात आहे.
रशिया-युक्रेन युद्ध तसेच उष्णतेच्या लाटेमुळे देशात इतर अनेक पिकांबरोबर गव्हाच्या उत्पादकतेवर परिणाम झाला आहे. देशातंर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारात गव्हाच्या किंमती वाढल्याने सरकारने गव्हाच्या निर्यातीवर तात्काळ बंदी घातली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात गव्हाच्या किंमतीत 40 टक्के वाढ झाली आहे. तर, डिझेल दरवाढीमुळे वाहतूक खर्चात वाढ झाली आहे. याचा एकत्रित परिणाम गव्हाच्या किंमती वाढण्यात झाला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरामध्ये जानेवारी महिन्यात प्रति किलो गहू 24 रुपये किलो दराने मिळत होता. गेल्या चार महिन्यांमध्ये या दरात 15 ते 16 टक्के वाढ झाली आहे. एमपी आणि लोकवन गव्हाच्या किमतीत ही वाढ केली आहे. सध्या हा गहू 28 रुपये किलो या दराने मिळत आहे.