मिंडवस्ती प्राथमिक शाळेमध्ये कृषिदूतांच्या उपस्थितीत कृषी दिन उत्साहात

कोळकी  – जि. प. शाळा मिंडवस्ती (साठेफाटा) येथे कृषी दिन कृषी महाविद्यालय बारामती येथील कृषिदूतांच्या सहाय्याने साजरा करण्यात आला. त्यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका शकुंतला पवार यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण संगोपन करण्याविषयी मार्गदर्शन केले.

महाराष्ट्र शासनाच्यावतीने संपूर्ण महाराष्ट्र राज्यात वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषीदिन साजरा करण्यात येतो. कृषीदिनाच्यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांद्वारे शिक्षकांच्या व कृषीदूतांच्या मदतीने झाडे लावा झाडे जगवा, जय जवान, जय किसानचा नारा देत प्रभातफेरी काढण्यात आली. त्याचबरोबर शाळेच्या आवारात आणि गावात वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाच्यावेळी मुख्याध्यापिका शकुंतला पवार, शिक्षिका उषा पवार, शिक्षक राजेश बोराटे, संजय बडे, ज्ञानेश्‍वर खेडकर, रमेश नायकोडे अध्यापकवृंद आणि धीरज अहिवळे, रणजित गायकवाड, शुभम गायकवाड, ऋषिकेश रसाळ, हर्षवर्धन शिंदे, आकाश वळकुंदे, पी. जे. आदित्य रेड्डी, वंशीकृष्णा रेड्डी हे कृषीदूत उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.