मुबंई – नवी मुंबई काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक व त्यांच्यासोबत काँग्रेसच्या १२४ पदाधिकारी यांनी शुक्रवारी मध्यरात्री, सागर बांगला (मुंबई) येथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीसाठी हा धक्का मानला जात आहे.
यावेळी मंत्री रवींद्र चव्हाण व आमदार निरंजन डावखरे यांच्या उपस्थित महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे बेलापूर विधानसभा प्रभारी शार्दुल कौशिक व माजी नगरसेवक राजू शिंदे यांचाही प्रवेश पार पडला.
देवेंद्र फडणवीस यांनी पदाधिकाऱ्यांना संबोधित करत असताना सांगितले की, ‘भाजपा एक परिवार आहे आणि यात तुम्हा सर्वांचे स्वागत करत असताना मी तुम्हाला आश्वासित करतो की पक्ष संघटना संपूर्णपणे तुम्हा सर्वांच्या पाठीशी संपूर्ण ताकतीने उभी राहील.’ तसेच त्यांचे आभार व्यक्त करताना अनिल कौशिक यांनी नवी मुंबईत भाजपा अधिक बळकट करण्याची हमी दिली.