मुंबई – एकनाथ शिंदे यांच्या गटाला केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह दिले. यानंतर आता एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात पक्षामध्ये मोठं इनकमिंग सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे. डॉन अरुण गवळीच्या भावानेही शिंदे गटात प्रवेश केल्याचे समोर आले आहे. यामुळे एकनाथ शिंदे यांची ताकद आता आणखी वाढणार आहे.
आगामी महापालिकेच्या टृष्टीकोनातून सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे.आसात शिंदे गटाने मुंबईत आपली ताकद वाढवण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. मुंबईच्या भायखळ्यातील दगडी चाळीतील शेकडो कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. यामध्ये डॉन अरुण गवळीचा भाऊ प्रदीप गवळी आणि माजी नगरसेविका वंदना गवळी यांचा देखील शिंदे गटात प्रवेश झाला.
मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर हा पक्ष प्रवेश पार पडला. मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडियावरून यावेळेसचे काही फोटो देखील पोस्ट केले आहेत. “मुंबईतील भायखळा परिसरातील माजी नगरसेविका वंदना गवळी आणि प्रदीप गवळी यांच्यासह अखिल भारतीय सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला” अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी आपल्या सोशल मीडियावरून दिली आहे.
मुंबईतील भायखळा परिसरातील माजी नगरसेविका वंदना गवळी आणि प्रदीप गवळी यांच्यासह अखिल भारतीय सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. pic.twitter.com/4m0fLZRBX4
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) February 25, 2023