सूचनाफलकच अतिक्रमणांच्या विळख्यात

सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष : वळण रस्ते बनले अपघात क्षेत्र

भावीनिमगाव –
अनेक रस्त्यावर झाडाझुडपाचे, वेड्याबाभळीने अतिक्रमण केले असून अनेक ठिकाणी सुचना फलकच अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलेले दिसत आहेत. यामुळे रस्ता सुरक्षा व्यवस्था असुन अडचण नसुन खोळंबा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. रस्त्यावर झाडाझुडपाचे अतिक्रमणाणे वळण रस्ते अपघात क्षेत्र बनले आहेत. याकडे संबंधित विभागाचे साफ दुर्लक्ष असल्याचे दिसत आहे.

रस्त्यावर वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना पुढील रस्त्याची माहिती देण्यासाठी जागोजागी दिशादर्शक, पुल, वळण, अपघात प्रवण क्षेत्र, गाव, शाळा याची माहितीपर व इतर छोटे-मोठे सुचना फलक रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभे केलेले असतात. जेणे करून वाहन चालकास रस्त्यावर चालणे सोईस्कर व विनाअपघात प्रवास करता येईल हा उद्देश सार्वजनिक बांधकाम विभागाचा असतो. मात्र एक दा हे फलक उभारले की याकडे विभागाचेच दुर्लक्ष होते. यामुळे मात्र नवीन वाहन चालकांना रस्त्याचा अंदाज येत नसल्याने ते अपघाताला बळी पडतात.

भातकुडगाव फाटा ते दहिगाव ने या रस्त्यावर अनेक ठिकाणी रस्ता वळणाचा आहे. आणि या वळणावर खदाणीतील वेड्याबाभळी वाढुन रस्त्यावर काट्या आल्याने समोरून वाहण किती अंतरावर आहे याचा अंदाज येत नसल्याने वाहन चालकास रस्त्यावर आपला जीव मुठीत धरून चालावे लागते आहे. तरी या वळणावरील काट्या संबंधित विभागाच्या वतीने काढण्यात याव्यात अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधुन होते आहे. तर सुचना फलकावरील माहिती अक्षरे अर्धवट पुसली गेली असल्याने हे फलक अनेक ठिकाणी फक्त गंजलेल्या स्वरूपात उभे असुन अनेक ठिकाणीचे फलकच गायब झाले आहेत. तर जिथे गरज आहे तिथे सुविधा देण्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने आडमुठे धोरण अवलंबले जात असल्याने रस्त्यालगत असलेल्या शाळा, महाविद्यालये परीसरात कायम अनुचित प्रकार घडत असतात.

भातकुडगाव फाटा ते दहिगाव ने या रस्त्यावर झाडाझुडपाच्या अतिक्रमणाकडे व आंत्रे येथील शहर टाकळी विद्यालयाच्या लगत हा रस्ता असुन मुलांच्या सुरक्षतेसाठी रस्त्यावर स्पीड ब्रेकर बसवण्याची अनेक दिवसांपासून असलेल्या मागणीकडे सार्वजनिक बांधकाम विभाग कानाडोळा करत आहे.

शिवाजीराव खराडे , उपाध्यक्ष, शालेय व्यवस्थापन समिती

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.