नवी दिल्ली -सार्वजनिक इंधन कंपन्यांनी बुधवारी सलग 18 व्या दिवशी डिझेलच्या दरात वाढ केली. मात्र, पेट्रोलचा दर जैसे थे ठेवण्यात आला. त्यामुळे देशाची राजधानी दिल्लीत प्रथमच पेट्रोलपेक्षा डिझेल महाग झाले आहे.
डिझेलच्या दरात नव्याने 48 पैशांची वाढ करण्यात आली. त्यामुळे 18 दरवाढींत मिळून डिझेल लिटरमागे तब्बल 10 रूपये 49 पैशांनी महागले. तर, 17 दरवाढींत मिळून पेट्रोलच्या किमतीत 8 रूपये 50 पैशांची भर पडली. आता दिल्लीत पेट्रोलचा दर 79 रूपये 76 पैसे, तर डिझेलचा दर 79 रूपये 88 पैसे इतका झाला आहे.
सार्वजनिक कंपन्यांकडून करण्यात येणारी दरवाढ संपूर्ण देशासाठी लागू आहे. मात्र, प्रत्येक राज्यात पेट्रोल आणि डिझेलवर स्थानिक विक्री कर किंवा व्हॅटचा वेगवेगळा दर आकारला जातो. त्यामुळे राज्याराज्यांत दोन्ही इंधनांचे दर वेगवेगळे आहेत.