सकाळी-सकाळी पोलीस थेट घरी आले आणि म्हणाले…

"हॅप्पी ऍनिव्हर्सरी डॉक्‍टर'

पुणे – दोघेही डॉक्‍टर…करोना काळात सकाळी 9 वाजता घराबाहेर पडल्यानंतर दोघेही रुग्णसेवा करून रात्री उशिरा घरी परततात. शनिवारी त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. पण, रुग्णसेवा-लॉकडाऊन आणि वेळेच्या अभावामुळे त्यांना एकमेकांसाठी ना केक घेता आला, ना एखादे गिफ्ट! डॉक्‍टर पतीने ही व्यथा पुणे पोलिसांच्या ट्‌विटरवर टाकली आणि शनिवारी सकाळी साडेआठ वाजता बेल वाजली. दरवाजा उघडला तेव्हा, “हॅपी ऍनिव्हर्सरी’ म्हणत एका पोलिसाने डॉक्‍टर दाम्पत्यास शुभेच्छा देत त्यांना केकचा बॉक्‍स दिला. पोलिसांच्या या “सरप्राइज गिफ्ट’ने डॉक्‍टर दाम्पत्य अक्षरशः भारावून गेले.

डॉक्‍टर आणि पोलीस हे दोघेही करोना पुणेकरांचे जीव वाचवण्यासाठी रात्रंदिवस झटत आहेत. रुग्णसेवा करणाऱ्या औंधमधील अशाच एका डॉक्‍टर दाम्पत्याचा शनिवारी लग्नाचा वाढदिवस होता. लॉकडाऊनमुळे शॉपिंग किंवा सेलिब्रेशन करण्याची कुठलीच संधी नाही. रुग्णसेवेमुळे केक आणण्यासाठीही वेळ नाही.

अशा स्थितीतच डॉक्‍टर पतीने शुक्रवारी पुणे पोलिसांच्या ऽलर्ििीपशलळीूं यावर ट्‌विट केले. “सर आमच्या लग्नाचा उद्या वाढदिवस आहे आणि दुकाने बंद आहेत. केक आणण्यासाठीही जाऊ शकत नाही. आम्ही दोघेही डॉक्‍टर असून लग्नाच्या वाढदिवस असतानाही आम्ही कामावर आहोत.
अशा परिस्थितीत मी माझ्या पत्नीला ऍनिव्हर्सरीचे काय गिफ्ट देऊ, तुम्हीच सांगा.’ अशा शब्दांत थेट पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनाच भावनिक साद घातली. गुप्ता यांनीही ते ट्विट आवर्जुन पाहिले आणि पोलीस कर्मचाऱ्यांनीदेखील पुढील “कर्तव्य’ पार पाडले. यावर संबंधित डॉक्‍टर दाम्पत्याने पोलीस आयुक्‍त आणि कर्मचाऱ्यांचे आभारही मानले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.