मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात अमित शहांना देखील केंद्रीय मंत्रीपदाची जबाबदारी

दिल्ली – देशाचे १५वे पंतप्रधान म्हणून आज नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती भवनामध्ये आयोजित करण्यात आलेल्या भव्यदिव्य सोहळ्यामध्ये पंतप्रधानपदाची शपथग्रहण केली आहे. पंतप्रधानांसोबतच त्यांच्या नव्या मंत्रिमंडळाच्या नव्या शिलेदारांनी देखील केंद्रीय मंत्रिपदाची शपथग्रहण केली असून या शिलेदारांमध्ये २०१४पासून भाजपच्या अनेक विक्रमी राजकीय विजयांचा शिल्पकार ठरलेल्या भाजप अध्यक्ष अमित शहा यांचा देखील समावेश आहे.

भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी यंदा पहिल्यांदाच गुजरातमधील गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढविताना विक्रमी मताधिक्याने विजय संपादित केला आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपला यंदाच्या लोकसभा निवडणुकांमध्ये मोठं जनमत मिळाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात अमित शहा यांचा देखील समावेश केला जाईल असा अंदाज माध्यमांमध्ये बांधला जात होता. अशातच आता अमित शहा यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाची शपथ घेतली असल्याने माध्यमांचा नादाज खरा ठरला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)