नवी दिल्ली – करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जगभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. यामुळे सर्व खासगी आणि सरकारी कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम दिले आहे. अशात महत्वाची मीटिंग करण्यासाठी व्हिडीओ कॉन्फरसिंगचा आधार घेत आहे. मात्र, ब्राझीलमधील एका मीटिंगमध्ये अजीब गोष्ट घडली. यामुळे सगळेच हैराण झाले.
ब्राझीलचे राष्ट्रपती जैर बोलसनोरो यांची करोना व्हायरससंबंधित अधिकाऱ्यांसोबत मिटिंग सुरु होती. यावेळी एक अधिकारी कपडे उतरवून अंघोळ करू लागला. तो अधिकारी कॅमेरा बंद करण्याचे विसरल्याने हा प्रकार घडला. मात्र, हे पाहून सर्वच आश्चर्यचकित झाले. या मीटिंगमधील काही स्क्रीनशॉट्सही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
दरम्यान, याआधीही एप्रिलमध्ये अशीच एका घटना सोशल मीडियावर चर्चेत होती. एका ऑनलाईन सुनावणीदरम्यान न्यायाधीश शर्टलेस दिसले होते.